डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतंर्गत (बार्टी) स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी एक उत्तम संधी
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीने स्पर्धा परीक्षेसची तयारी करणाऱ्यांसाठी एक उत्तम संधी निर्माण करून दिली आहे. बार्टीतर्फे महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी एमपीएससी, यूपीएससी, पोलीस भरती यासाठी मोफत प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. त्यासाठी बार्टीतर्फे अर्ज मागवण्यात आले आहेत. 3 जुलै 2024 पर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहे.
कोणकोणत्या स्पर्धा परीक्षांसाठी मिळणार प्रशिक्षण:- बार्टीतर्फे संघ लोकसेवा आयोग (नागरी सेवा), महाराष्ट्रा लोकसेवा आयोग (राज्यसेवा, न्यायिक सेवा, अभियांत्रिकी सेवा), पोलीस व मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण, बँक, (आयबीपीएस) रेल्वे, एलआयसी व इतर तत्सम स्पर्धा परीक्षांच्या पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज मागवण्यात येत आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यात येतील.
स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांच्या अंमलबजावणीकरिता महाराष्ट्र शासनामार्फत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक 30 ऑक्टोबर 2023 च्या शासन निर्णयानुसार सर्वंकष धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने पुण्यातील बार्टीमार्फत सन 2024-25 करिता वरील परीक्षांच्या पूर्व प्रशिक्षणासाठी हे अर्ज मागवण्यात आले आहेत.

पात्रता :- उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा >>> उमेदवाराकडे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा दाखला व अधिवास असणे गरजेचे आहे.उमेदवाराचे वय वरील परीक्षांच्या अटी व शर्तीनुसार असावे.आर्थिक उत्पन्न आठ लाखांपर्यंत असणाऱ्या उमेदवारालाच त्यासाठी अर्ज करता येणार आहे.अनाथ आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उणेदवाराकडे महाराष्ट्र शासानाच्या महिला व बालविकास विभागाकडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.उमेदवार दिव्यांग असल्यास 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याच्या प्रमाणापत्राची साक्षांकित प्रत सदार करावी.
अर्ज करण्याची पद्धत :- या प्रशिक्षणासाठी पात्र ठरायचे असेल तर तुम्हाला एक परीक्षा द्यावी लागेल. सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटीत मिळालेल्या गुणांच्या आधारेच या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येईल.
इच्छुक उमेदवारांनी http://trtipune.in/bartregmay24/ लिंकवरुन ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 3 जुलै 2024 आहे.