Take a fresh look at your lifestyle.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या प्रशिक्षण योजनेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

0

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) २ मुंबई शहर व उपनगर साठी विविध प्रशिक्षण योजनेचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून, मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील कुटुंबाच्या सामाजिक,आर्थिक उन्नतीसाठी रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावेत या उद्देशाने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील इच्छुक पात्र विद्यार्थ्यांनी योजनेच्या लाभासाठी अर्ज

करावेत, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे २ मुंबई शहर / उपनगर जिल्हा व्यवस्थापक अंगद कांबळे यांनी केले आहे. जिल्ह्यातील मातंग समाज व तत्सम बारा पोटजातीमधील इच्छुक पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

सदर प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेची नोंदणी कौशल्य विकास व उद्योजकता विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या पोर्टलवर नोंदणी केलेली असावी. या प्रशिक्षणासाठी अदा करावयाची प्रशिक्षणाची फी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे अदा करण्यात येईल.

प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर शासनाच्या नियमानुसार आवश्यक त्या परीक्षेला बसविण्याची जबाबदारी संस्था चालकांची राहील. त्या शिवाय या संस्थेची प्रशिक्षण की अदा केली जाणार नाही. या पात्र संस्थाचालकांनी नियम व अटीशर्तीनुसार प्रस्ताव https://www.slasdc.org या प्रणालीवर सादर करण्यात यावा. ही प्रशिक्षण संस्था २ मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील असणे आवश्यक आहे.

सदरील अर्ज ३० जून २०२४ पर्यंत सादर करावा.