Take a fresh look at your lifestyle.

जलसंधारण विभागातील 670 पदांसाठी होणार फेरपरीक्षा

0

14, 15, 16 जुलै रोजी होणार परीक्षा – राज्य सरकारच्या मृद व जलसंधारण विभागाने या निर्णयाचे एक परित्रक प्रसिद्ध केले आहे. या परीपत्रकानुसार जुलै महिन्यात ही परीक्षा होणार असून ही परीक्षा पारदर्शक व्हावी या अनुशंगने 7 शहरातील टीसीएस-आयओएन कंपनीच्या 10 अधिकृत केंद्रावरच घेतली जाणार आहे. TCS च्या मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथील केंद्रावर 14, 15, 16 जुलै रोजी ही परीक्षा घेतली जाणार आहे.

अमरावतीत झाला होता गैरप्रकार – फेब्रुवारी महिन्यात या पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र अमरावती शहरातील परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्याचे निदर्शनास आले होते. या घटनेची गंभीर दखल घेत विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन सरकारने ही परीक्षाच रद्द केली. आता हीच परीक्षा पुन्हा एकदा TCS कंपनीच्या परीक्षा केंद्रावर होणार आहे. तसा निर्णय घेण्यात आला आहे.

आता गैरप्रकार निदर्शनास आल्यास होणार कठोर कारवाई – यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडून आल्यास संबधितास जबाबदार ठरवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना मंत्री संजय राठोड यांनी दिल्या आहेत.

ही परीक्षा संगणक आधारित असून प्रत्येक सत्राच्या प्रश्न पत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार आहेत.एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.

पहिले सत्र ते अंतिम सत्र या मधील प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व त्याचीकाठीण्यता यांचे समाणीकरण करण्याचे पध्दतीने गुणांक निश्चीत करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. ते सर्वांना बंधनकराक राहिल. याची सर्व नोंद घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या.

मात्र, महत्त्वाची बाब म्हणजे परीक्षेच्या पहिल्याच सत्रात प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती समोर आली आहे.एका अधिकाऱ्याने ही प्रश्नपत्रिका फोडण्यास मदत केली आहे. याचे पुरावेही काही विद्यार्थ्यांनी बाहेर पाठवले आहे.काही दिवसांआधीच तलाठी भरती परीक्षेचा निकाल जाहीर झाला. मात्र, अद्यापही या परीक्षेतील गोंधळ सुटलेला नाही.

तलाठी भरतीमध्येही मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे अनेक पुरावे विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडून दिले जात आहेत.मात्र, शासनाकडून यावर अद्यापही यावर कठोर कारवाई केली गेली नाही.

त्यानंतर आता मृदू व जलसंधारण विभागाच्या जलसंधारण अधिकारी पदासाठी बुधवारी झालेल्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.