विद्यार्थ्यांना ‘या’ तारखेपासून लागणार उन्हाळी सुट्टी आणि ‘या’ तारखेपासून सुरु होणार शाळा
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्याच्या शिक्षण विभागाकडून शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार 2 मेपासून उन्हाळी सुट्टी सुरू होणार आहे.
तसेच राज्यातील शाळा 15 जूनपासून सुरु होणार आहेत तर विदर्भातील शाळा 1 जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.
प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी या संदर्भातील संयुक्त परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.