Take a fresh look at your lifestyle.

कष्टकऱ्यांसाठी अटल पेन्शन योजना….

0

केंद्र सरकारने सात वर्षांपूर्वी असंघटित क्षेत्रासाठी अटल पेन्शन योजना आणली. या क्षेत्रातील व्यक्तींनाही वयाच्या ६० वर्षांनंतर पेन्शन स्वरूपात काही रक्कम हाती पडावी, यासाठी ही योजना आहे. ही योजना घेणारा रक्कम भरेल तेवढीच रक्कम केंद्र सरकार त्या खात्यात सुरुवातीला पाच वर्षे भरत होते. मात्र योजनेला प्रतिसाद वाढल्याने केंद्राने आता त्यातील आपला सहभाग बंद केला आहे.

अटल पेन्शन योजनेमध्ये कसे सहभागी व्हाल 👇🏻

• १८ ते ४० वयोगटातील कोणीही व्यक्ती यात सहभागी होऊ शकते. त्यांना वयाच्या ६० वर्षापर्यंत पैसे भरावे लागणार. त्यासाठी त्या व्यक्तीचे बँक खाते असणे आवश्यक आहे. ते आधार कार्डाला लिंक हवे, तसेच त्यासोबत मोबाईल नंबरही हवा. म्हणजे त्यावर खात्याशी संबंधित माहिती येत राहते.

राष्ट्रीयीकृत बँका, काही खासगी बँका, पोस्ट ऑफिसात हे खाते उघडता येते. या खात्यासाठी नॉमिनेशन आवश्यक आहे. तुम्हाला वयाच्या ६० वर्षानंतर किती पेन्शन हवी, ते ठरवायचे. त्यानुसार तुम्हाला किती रक्कम जमा करावी लागेल, ते ठरते. ती रक्कम आपल्या बँक खात्यातून वळती केली जाते.