फळे – धान्य महोत्सव भरवा आणि भरघोस अनुदान मिळवा…
ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या फळे आणि धान्य महोत्सव भरवतील अशा शेतकऱ्यांसाठी पणन मंडळाकडून अनुदानाचा लाभ देण्यात येत आहे. आंबा, संत्रा, मोसंबी, द्राक्ष या सारखी हंगामी फळे तसेच धान्य यांचे थेट उत्पादक ते थेट ग्राहक विक्रीसाठी महोत्सवांचे आयोजन करण्याकरिता ही योजना राबविण्यात येते.
फळ व धान्य महोत्सव अनुदान योजनेचे लाभार्थी
• राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्या, कृषि मालाच्या विपणनासंबधित स्थापित असलेल्या सहकारी संस्था,
• शासनाचे विभाग,
• उत्पादकांच्या सहकारी संस्था,
• शेतकरी उत्पादक कंपन्या,
• पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट व अधिनियम 1860 अंतर्गत नोंदणीकृत संस्था.