Take a fresh look at your lifestyle.

प्रत्येक जिल्ह्यात दोन वसतिगृहे; ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार लाभ…

0

इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासन स्वतः प्रत्येक जिल्ह्यात दोन वसतिगृहे भाड्याने घेणार आहे. यात विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर उपलब्ध होणार आहेत. शासनाने २८ फेब्रुवारी २०२३ रोजी तसा सुधारित आदेश काढला आहे. दोन्ही वसतिगृहे राज्य वसतिगृह प्रवेशासाठी शासन चालविणार जिल्ह्याच्या ठिकाणी मुलांसाठी एक आणि मुलींसाठी एक वसतिगृह सुरु करण्यात येणार आहेत. या प्रवर्गातील 100 मुले आणि 100 मुली यांच्यांकरिता वसतिगृहासाठी दोन इमारती भाड्याने घेण्यात येणार आहेत.

यासाठी मॅट्रिकोत्तर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या वसतिगृहांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

कोणाला मिळणार लाभ  

विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा,

इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग प्रवर्गातील असावा,

ज्यावेळी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतला, त्यावेळी किमान ६० टक्के गुण अथवा ग्रेडेशनचे गुण असावेत.

या योजनेसाठी विद्यार्थ्याला सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील जातीचा दाखला,वैध जातपडताळणी प्रमाणपत्र,आधार क्रमांक संलग्न राष्ट्रीयीकृत अथवा शेड्यूल्ड बँकेतील खाते द्यावे लागेल.

विद्यार्थ्यांना भोजन खर्च, निर्वाह भत्ता, मुलींसाठी स्वच्छता साधने, वसतिगृह प्रवेशित मुले आणि मुलींना नाईट ड्रेस, वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी अॅप्रन, वैद्यकीय व इतर साहित्य, अभियांत्रिकी विद्यार्थी ब्रॉयलर सूट, अभियांत्रिकी पदवी, पदविका ड्रायव्हिंग बोर्ड इतर साहित्य, शारीरिक शिक्षण, शिक्षणशास्त्र महाविद्यालय गणवेश याशिवाय वसतिगृहांना शैक्षणिक सहल, प्रोजेक्ट रिपोर्ट, स्नेहसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा वस्तू, इतर खर्च म्हणून १५००० रुपये अशा अनेक सुविधा मिळणार आहेत.

जिल्ह्याच्या ठिकाणी मुलांसाठी व मुलींसाठी प्रत्येकी एक वसतिगृह सुरु केले जाणार आहे. यात अद्ययावत खोल्या, स्वच्छतागृह, विजेची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था असेल. तसेच भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.