‘या’ विद्यार्थ्यांना संपूर्ण शालेय फी माफ; शासन निर्णय जारी…
महसुल व वन विभागामार्फत दुष्काळ जाहीर केलेल्या कार्यक्षेत्रातील तालुक्यांमध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट होणा-या विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी / फी प्रतिपूर्ती करण्याची योजना कार्यन्वित आहे. सद्यस्थितीत अवर्षणग्रस्त तालुक्यांतील फी माफीसाठी इयत्ता १२ वी मधील २,८४,२०८ विद्यार्थ्यांना रू.१५,८८,२४,९२५/- इतकी तसेच इयत्ता १० वी ३,२८,९१४ विद्यार्थ्यांना रू.१६,१९,६२,५५०/- इतकी रक्कम येते.

या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करावयाची झाल्यास सन २०२३-२४ मध्ये वितरीत करण्यात आलेली रक्कम वजा जाता एकूण रू.३२,०७,९७,४७५/- इतक्या रक्कमेची आवश्यकता आहे. त्यापैकी एकुण रू. ८.३० कोटी इतका निधीचे पुनर्विनियोजन करण्यात आले आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये मंजूर अर्थसंकल्पित तरतुदीमधून वित्त विभागाने वितरीत केलेल्या निधीच्या प्रमाणात उपरोक्त तक्त्यात नमूद लेखाशिर्षाखाली पुनर्विनियोजनानंतर एकूण रु.८.३० कोटी इतका निधी वितरीत करण्यास व सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर उपलब्ध करुन देण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.