Take a fresh look at your lifestyle.

प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजना…

0

राज्यातील सर्व इच्छुक उमेदवारांना त्यांच्या रुचीच्या क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना अधिक मागणी असलेल्या उद्योग, सेवा व तत्सम क्षेत्रात रोजगार / स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.

राष्ट्रीय पातळीवर रोजगाराची अधिकतम संधी असलेली खालील ११ क्षेत्रे कौशल्य विकासासाठी प्राधान्य क्षेत्रे म्हणून निवडण्यात आली आहेत.

१. बांधकाम, २. उत्पादन व निर्माण, ३. वस्त्रोद्योग, ४. ऑटोमोटिव्ह, ५. आतिथ्य, ६. आरोग्य देखभाल, ७. बँकिंग, वित्त व विमा, ८. संघटित किरकोळ विक्री, ९. औषधोत्पादन व रसायने १०. माहिती तंत्रज्ञान व संलग्न

अर्ज करण्याची पद्धत :- इच्छुक उमेदवाराने महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (MSSDS) च्या संकेतस्थळावरून, पाहिजे त्या क्षेत्रातील प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांच्या यादीमधून संबंधित संस्थेकडे संपर्क करणे आवश्यक आहे.

संकेतस्थळ : https://kaushalya.mahaswayam.gov.in