Take a fresh look at your lifestyle.

शेळी आणि मेंढी पालन करणाऱ्यांच्या भाग भांडवलात चौपट वाढ…

0

शेळी आणि मेंढी पालन करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात चौपट वाढ करण्यात आली आहे.

महामंडळाचे भाग भांडवल 25 कोटी रुपयांवरुन 99.99 कोटी रुपये झाले आहे. राज्यातील शेळी, मेंढी पालन करणाऱ्यांच्या उत्कर्षासाठी शासनानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत पाठपुरावा केला होता याला अखेर यश आलं आहे.