मोफत वीज योजनेसाठी ‘या’ लिंक वर करा ऑनलाईन अर्ज…
केंद्र सरकारने महिन्याभरापूर्वी पीएम सूर्य घर मोफत वीज योजना जाहीर केली होती. अवघ्या एका महिन्यात देशभरातील सुमारे एक कोटी कुटुंबांनी या योजनेत रजिस्ट्रेशन केले आहे.
यासंदर्भात पीएम मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. मात्र ज्या नागरिकांनी अद्याप रजिस्ट्रेशन केले नाही त्यांनी लवकरात लवकर https://pmsuryaghar.gov.in/ या वेबसाइटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे.