मंत्रिमंडळ निर्णयातील (संक्षिप्त) शासन निर्णय…
🔸राज्य शिखर संस्थेच्या कळंबोली येथील इमारतीसाठी शुल्क माफी.
🔸तात्पुरत्या स्वरूपातील ६४ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणार.
🔸मालमत्ता विद्रूपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास. दंड सुद्धा वाढविला.
🔸१३८ जलदगती न्यायालयांसाठी वाढीव खर्चाला मान्यता.
🔸संस्कृत, तेलुगू, बंगाली साहित्य अकादमी स्थापणार.
🔸शासकीय, निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण.
🔸विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ. ५० कोटी भागभांडवल.
🔸पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात भरीव वाढ.
🔸हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करणार. रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली ‘मॅनहोलकडून मशीनहोल’कडे योजना.
🔸संगणक गुन्हे तातडीने निकाली निघणार. सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबविणार.
🔸राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार.
🔸ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ, ५० कोटी रुपयांचे अनुदान.
🔸भुलेश्वरची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला जिमखान्यासाठी वाटप.

🔸संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारणार; गुन्ह्यांची वेगाने उकल करणार.
🔸वृद्ध साहित्यिक व कलाकारांना ५ हजार रुपये मानधन.
🔸राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी २० कोटी रुपययांचा अतिरिक्त निधी मंजूर.
🔸श्रीगोंदा तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित.