नझूल जमिनींसाठी विशेष अभय योजना…
नागपूर व अमरावती विभागातील निवासी कारणांसाठी भाडेतत्त्वावर दिलेल्या नझूल जमिनींसाठी विशेष अभय योजना राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
ही अभय योजना ज्या नझूल जमिनी निवासी कारणांसाठी लिलावाद्धारे, प्रीमिअम अथवा अन्यप्रकारे भाडे तत्त्वावर दिल्या आहेत त्यांनाच 31 जुलै 2025 पर्यंत लागू राहील. नझूल जमिनीच्या फ्री होल्ड (भोगवटादार – 1) करण्यासाठी जमिनीच्या प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील बाजारमूल्याच्या 2 टक्के एवढा प्रीमिअम आकारण्यात येईल. फ्री होल्ड करण्यासाठी अन्य अटी शर्ती कायम राहतील. नझूल जमिनीचे वार्षिक भूभाड्याची आकारणी विहित प्रचलित दराने 31 जुलै 2025 पूर्वी कालमर्यादेत भरणे अनिवार्य असेल. त्यानंतर भूभाडे न भरल्यास थकीत भूभाडे व त्यावर वार्षिक 10 टक्के व दंडनीय व्याज आकारण्यात येईल.
स्वामी विवेकानंद विद्यार्थी सहाय्य योजना…
विद्यार्थ्यांना कोणत्या न कोणत्या कारणाने नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते अशावेळी बरेच विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. विद्यार्थ्यांना आर्थिक मदत होईल या उद्देशाने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून नव्याने सदर योजना सुरू केलेली आहे.
नियम व अटी:-
१ सदर योजना व्यवसायिक व अव्यवसायिक पदवी व पदव्युत्तर
अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार लागू राहील.
२. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या चारही विद्याशाखेतील प्रत्येकी आठ हजार विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार १,०००/- प्रमाणे ३२,००० विद्यार्थ्यांना लाभ मिळेल.
३. महाविद्यालये/ विद्यापीठ शैक्षणिक विभागामध्ये विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेला असावा.
४. विद्यार्थ्यांची नियमित अभ्यासक्रमात किमान ७५ टक्के उपस्थिती असणे आवश्यक राहील या संदर्भात प्राचार्यांनी दाखला देणे आवश्यक राहील.
५. पुरग्रस्त, दुष्काळग्रस्त व आपत्नीग्रस्त भागातील विद्यार्थी म्हणून मा. प्राचार्य / विद्यापीठ विभागप्रमुख यांनी शिफारस करणे आवश्यक राहील.
६. विद्यार्थ्यांस या योजनेच्या कालावधीत कोणतीही पगारी नोकरी
स्विकारता येणार नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत :- वर उल्लेख केलेल्या शिष्यवृत्ती/अर्थसहाय्य योजनाकरीता विहित नियम व अटी विचारात घेऊन पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने
http://bcud.unipune.ac.in/Scholorships/Applicant/Login.aspx या संकेतस्थळावर अर्ज करणे आवश्यक असून आवश्यक ती कागदपत्रे अर्जासोबत अपलोड करावीत.