Take a fresh look at your lifestyle.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना…

0

मागासवर्गीय घटकातील गुणवत्ताधारक गरजू विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठामार्फत सदर शिष्यवृत्ती योजना कार्यान्वित केलेली आहे. सदर योजना फक्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी लागू असून पदवी व पदव्युत्तर अव्यवसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज (सर्व संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठ विभागातील एकत्रित) गुणवत्तेनुसार विचारात घेतले जातील, त्यापैकी ४८ टक्के मागासवर्गीय विद्यार्थ्यांना एकत्रित गुणवत्तेनुसार व उर्वरित ५२ टक्के विद्यार्थ्यांना त्या त्या प्रवर्गासाठी लागू असलेल्या आरक्षणाच्या टक्केवारीनुसार गुणानुक्रमे अर्ज विचारात घेतले जातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील योजनेस पात्र विद्यार्थ्यांना पुढील निकषानुसार शिष्यवृत्ती योजना लागू राहील.

नियम व अटी :- 

१. सदरची योजना फक्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लागू राहील.

२. सदरच्या योजनेसाठी उत्पन्नाची कोणतेही अट राहणार नाही केवळ गुणवत्ता हाच निकष राहील.

३. मागील लगतच्या परिक्षेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी किमान ६० टक्के गुण संपादित केलेले असावेत.

४. पात्र विद्यार्थ्यांचे वय पदवी अभ्यासक्रमाकरीता २५ व पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरीता ३० पेक्षा जास्त नसावे.

५. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील ‘ योजनेस पात्र विद्यार्थ्यांना पुढील निकषानुसार शिष्यवृत्ती योजना लागू राहील.

ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत :- वर उल्लेख केलेल्या शिष्यवृत्ती / अर्थसहाय्य योजनाकरीता विहित नियम व अटी विचारात घेऊन पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने

http://bcud.unipune.ac.in/Scholorships/Applicant/Login.aspx या संकेतस्थळावर अर्ज करणे आवश्यक असून आवश्यक ती कागदपत्रे अर्जासोबत अपलोड करावीत.