Take a fresh look at your lifestyle.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी अर्थसहाय्य योजना…

0

आर्थिक दुर्बल घटकातील गुणवत्ताधारक गरजू विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठामधुन ही अर्थसहाय्य योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत सोबत जोडलेल्या नियत व अटीनुसार अव्यवसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या जास्तीत जास्त २० व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जास्तीत जास्त १० विद्यार्थ्यांस गुणानुक्रमे रु. ३,०००/- अर्थसहाय्य देण्यात येईल.

नियम व अटी:-

१. महाविद्यालये/विद्यापीठ शैक्षणिक विभागातील अव्यवसायिक पदवी अभ्यासक्रमास शिक्षण घेत असलेल्या जास्तीत जास्त २० व अव्यवसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी राहतील.

२. पात्र विद्यार्थ्यास पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी रू.३,०००/- आर्थिक सहाय्य देण्यात येईल.

३. विद्यार्थ्यांच्या पालकांचे (कुटूंबातील सर्व सदस्यांचे एकत्रित) वार्षिक उत्पन्न स. २,५०,०००/- पेक्षा जास्त नसावे, यासाठी संबंधित तहसिलदाराचा दाखला आवश्यक राहील.

४. विद्यार्थ्यांने मागील लगतच्या परीक्षेत किमान ६५ टक्के गुण संपादित केलेले असावेत.

५. महाविद्यालय/विद्यापीठ शैक्षणिक विभागामध्ये विद्यार्थ्यांने नियमित अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेला असावा.

ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत :- वर उल्लेख केलेल्या शिष्यवृत्ती / अर्थसहाय्य योजनाकरीता विहित नियम व अटी विचारात घेऊन पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने

http://bcud.unipune.ac.in/Scholorships/Applicant/Login.aspx या संकेतस्थळावर अर्ज करणे आवश्यक असून आवश्यक ती कागदपत्रे अर्जासोबत अपलोड करावीत.