महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत शासन शुद्धीपत्रक जारी
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ या योजनेंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची पुर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रक्कमेवर जास्तीत जास्त रु. ५० हजार पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येतो.

तथापि, कोल्हापूर जिल्हयातील ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषानुसार त्याची विहीत मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळण्याबाबत मा. लोकप्रतिनिधींनी केलेली विनंती विचारात घेऊन, केवळ कोल्हापूर जिल्ह्याकरिता, शासन कार्य नियमावली मधील कलम २९ (१) च्या तरतुदी नुसार उक्त योजनेच्या दि. २९.०७.२०२२ च्या शासन निर्णयातील (1) योजनेचा तपशील – ( ३ ) यामध्ये नमूद असलेल्या मूळ तरतुदीमध्ये खालीलप्रमाणे केलेल्या बदलास याव्दारे शासन मान्यता देण्यात आली आहे.