UPI द्वारे ऑनलाईन व्यवहार करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी!
सार्वजनिक WIFI :- ऑनलाइन पेमेंटसाठी सार्वजनिक वाय-फाय कधीही वापरु नका. हॅकर्सद्वारे सार्वजनिक वाय-फायद्वारे फोन आणि बँक खाते हॅक केले जाऊ शकते.
पासवर्ड :- बँक खाते आणि UPI अॅप सुरक्षित ठेवायचे असेल तर पासवर्ड आणि पिन सेट कराल तेव्हा अवघड पासवर्ड सेट करा.

पेमेंट हिस्ट्री :- आपण अनेकदा ऑनलाइन पेमेंट करतो परंतु त्यांच्या ट्रान्जेंक्शन हिस्ट्रीकडे लक्ष देत नाही. ही सवय आपण बदलायला हवी. त्यामुळे तुमचे नुकसान टाळण्यासाठी आपण ट्रान्जेंक्शन हिस्ट्री तपासायला हवी.
UPI अॅप वेळोवेळी अपडेट करा :- अॅप बऱ्याच काळापासून अपडेट न केल्यास हॅकर्सना आणि स्कॅमर्सना ते लगेच उपलब्ध होते. त्यामुळे जेव्हाही अॅप अपडेटचे ऑप्शन येते तेव्हा ते लगेच अपडेट करा.