मार्च महिन्यात बदलणार ‘हे’ नियम!
एलपीजी दर :- एलपीजीच्या किंमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला निश्चित केल्या जातात. तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला घरगुती व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती निश्चित करतात. त्यामुळे मार्च महिन्याच्या सुरवातीला LPG चे दर बदलू शकतात.
GST नियमांमध्ये बदल :- केंद्र सरकारने GST नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. 1 मार्च 2024 पासून GST नियम बदलत आहेत. आता 5 कोटींहून अधिक व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना ई-इनव्हॉइसशिवाय ई-बिल तयार करता येणार नाही.

फास्टॅग :- NHAI फास्टॅगचे KYC अपडेट करण्याची अंतिम तारीख 29 फेब्रुवारी निश्चित केली आहे. म्हणजेच आजच तुमच्या फास्टॅगचे केवायसी पूर्ण करावे लागणार आहे. अन्यथा तुमचं फास्टॅग निष्क्रिय किंवा ब्लॅकलिस्ट करू शकतात.
सोशल मीडियाचे नवीन नियम :- मार्च महिन्यापासून सोशल मीडियावर चुकीच्या माहितीसह कोणतीही बातमी प्रसारित झाल्यास दंड आकारला जाऊ शकतो. सोशल मीडिया सुरक्षित ठेवणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या नियमांत बदल होऊ शकतात.