Take a fresh look at your lifestyle.

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी

0

सदर योजनेसाठी सन २०२३-२४ साठी सन २०२३ च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रु. ३७९.९९ लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. वित्त विभागाच्या दि.०५.०२.२०२४ रोजीच्या परीपत्रकानुसार मंजूर निधीपैकी ७० टक्के म्हणजे रु. २६५.९९ लाख (रु. दोनशे पासष्ट लाख नव्यान्नव हजार फक्त) एवढा निधी राज्यात जुलै, २०१९ ते ऑगस्ट, २०१९ या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्हयातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य (राज्यस्तर)(कार्यक्रम), (२४३५०१३३) ३३ अर्थसहाय्य या लेखाशिर्षाअंतर्गत वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

२. सदर तरतूद खर्च करण्यासाठी (V०००४) सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अधिनस्त उपनिबंधक (अंदाज व नियोजन), सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे. तसेच लेखाधिकारी, अधिन सहकार आयुक्त व

निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषीत करण्यात येत आहे. सदर निधी आहरण करुन वेळेत खर्च होईल याची दक्षता सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी घ्यावी. तसेच या बाबतचा अहवाल व खर्चाची माहिती वेळोवेळी शासनास पाठवावी.

३. सदर खर्च मागणी क्रमांक व्ही – ०२, २४३५- इतर कृषीविषयक कार्यक्रम, ६०-इतर,(००) (१०१) शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना (००) (०२) नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी (राज्यस्तर) (२४३५०१३३), ३३ अर्थसहाय्य या लेखाशिर्षाखालील सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी उपलब्ध असलेल्या तरतूदीमधून करण्यात यावा.

8. सदर शासन निर्णय, नियोजन विभाग अनौपचारीक संदर्भ क्रमांक ७७/का.१४३१, दिनांक २९.०१.२०२४ अन्वये व वित्त विभाग अनौपचारीक संदर्भ क्रमांक १२३/२०२४/व्यय-२, दिनांक ०९.०२.२०२४ अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०२४०२२८१५२८०२९७०२ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकीत करुन काढण्यात आला आहे.