Take a fresh look at your lifestyle.

‘या’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर बांबू रोपे लागवडीकरीता अनुदान देणार…

0

१. दिनांक २८ जून २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार अटल बांबू समृध्दी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर बांबू रोपे पुरवठा करण्याची तरतूद होती. तथापि, त्यांच्या देखभालीकरिता अनुदान देण्याची तरतूद सदर योजनेत नसल्यामुळे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय बांबू अभियान या योजनेच्या धर्तीवर अटल बांबू समृध्दी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर बांबू रोपे लागवडीकरीता अनुदान देण्याची तरतूद करण्यात येत आहे.

२. दिनांक २८ जून २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्याला १ हेक्टरसाठी ६०० रोपे देण्याची तरतूद आहे. तसेच सदर शासन निर्णयात फक्त रोपांचे किमतीपैकी ८० टक्के किंवा ५० टक्के अनुदान लाभार्थ्यांचे भूधारणा मर्यादेनुसार देण्याची तरतुद आहे. रोपवनातील निंदणी, पाणी देणे, खत देणे, संरक्षण इत्यादी करिता तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे सदर तरतुद रद्द करुन त्याऐवजी २ हेक्टरकरिता १२०० रोपे लागवड व देखाभालीसाठी अनुदान देण्याची तरतूद करण्यात येत आहे.

योजनेचे उद्दीष्ट :-

अ) शेतक-यांना बांबू लागवडीसाठी अनुदान देणे.

ब) शेतीतून मिळणा-या उत्पन्नाला जोड देण्यासाठी व हवामान बदलास पूर्ण योग्य करण्यासंबंधी सहाय्यभूत होण्यासाठी तसेच उद्योगाच्या दर्जेदार कच्चा मालाच्या आवश्यकतेच्या उपलब्धतेसाठी शेत जमिनीवरील बांबू लागवडी खालील क्षेत्र वाढविणे,

क) बांबू लागवडीमुळे शेतक-यांचे उपजिवीकेचे साधन निर्माण करणे आणि शेतक-यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन त्यांची उपजिवीका उंचावण्यास मदत करणे.