घरेलू कामगारांना संसार उपयोगी भांडी संच वाटप करण्याबाबत शासन निर्णय जारी…
सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम २००८, या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, तसेच महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामार्फत घरेलू कामगारांची नोंदणी / नुतणीकरण वाढविणे, याअनुषंगाने योजना राबविण्यासाठी जिवीत/ सक्रीय नोंदीत असलेल्या घरेलू कामगारांना संसार उपयोगी भांडी संच वाटप करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येत आहे.

याबाबत विकास आयुक्त (असंघटित कामगार) महाराष्ट्र राज्य यांच्या दि.०४.०१.२०२४ च्या प्रस्तावास याद्वारे प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाने निविदा प्रक्रिया राबवून अंतिम केलेल्या मे मफतलाल इंडस्ट्रीज लि. या पुरवठादारास कार्यादेश देण्यात यावा.यासाठी लागणारा निधी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या मागणी क्र. के – ४, मुख्यलेखाशीर्ष २२३० कामगार व सेवायोजन या लेखाशीर्षाखालील (२२३० ५३४५) करण्यात आलेल्या तरतुदींमधून करण्यात येईल अथवा घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे शासकीय अनुदानामधून जो निधी संचित आहे त्यातून करण्यात येईल.