Take a fresh look at your lifestyle.

आता ‘ही’ परीक्षा होणार मराठीत; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय…

0

केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या (CRPF) कॉन्स्टेबल दलाच्या परीक्षेबाबत गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. सध्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या परीक्षेत इंग्रजी, हिंदीसह 13 प्रादेशिक भाषांमध्ये पेपर देण्यात येणार आहेत. त्यामध्ये मराठी भाषेचाही समावेश आहे.

सीआरपीएफ कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) परीक्षेच्या प्रश्नपत्रिका प्रादेशिक भाषांमध्ये सेट केल्या जातील. कॉन्स्टेबल जीडी परीक्षा ही स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे (एसएससी) आयोजित केलेल्या प्रमुख परीक्षांपैकी एक आहे. ज्यामध्ये देशभरातून लाखो उमेदवार बसतात.

या भाषांचा राहणार समावेश :- मराठी, आसामी, बंगाली, गुजराती, मल्याळम, कन्नड, तमीळ, तेलगू, उडिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी, कोकणी.