राज्यातील लोककलावंताच्या पथकांना अनुदान पॅकेज जाहीर…
राज्यातील लोककलावंताच्या पथकांना अनुदान पॅकेज अंतर्गत सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरीता भांडवली खर्चासाठी परिशिष्ट-अ मधील पात्र २८ कलापथकांना रुपये १२.०० लक्ष व प्रयोगासाठी परिशिष्ट-ब मधील पात्र ३७ कलापथकांना रुपये ७१.०० लक्ष असे एकूण रुपये ८३.०० लक्ष (अक्षरी रुपये त्र्याऐंशी लक्ष फक्त) इतक्या सहाय्यक अनुदानास या शासन निर्णयान्वये वित्तीय मान्यता देण्यात येत आहे.

०२.सदर खर्च लेखाशिर्ष मागणी क्र. झेडी – २,२२०५ कला व संस्कृती, १०२ कला व संस्कृती यांचे प्रचालन, (०२) (०९) कला व सांस्कृतिक संस्थांना सहाय्यक अनुदान (२२०५ १५३४) ३१ सहाय्यक अनुदान (वेतनेत्तर) या लेखाशिर्षाखाली सन २०२३-२४ या वर्षासाठी मंजूर असलेल्या आर्थिक तरतुदीतून भागविण्यात यावा.
३. यासाठी संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांना नियंत्रण अधिकारी तसेच लेखाधिकारी, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.
४. सदर खर्च वित्त विभागाच्या शासन निर्णय क्र. विअप्र-२०१३/विनिमय, दिनांक १७ एप्रिल, २०१५, वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८, भाग-पहिला, उपविभाग-३, अ.क्र. ४ परिच्छेद क्र. २७ (२) (अ) अन्वये प्रशासकीय विभागास प्राप्त अधिकारानुसार मंजूर करण्यात येत आहे.
०५. सदर प्रकरणी वित्त विभागाच्या शासन निर्णय क्र. अर्थसं-२०२३/ प्र.क्र.४०/ अर्थ-३, दिनांक १२ एप्रिल, २०२३ मधील सर्व परिच्छेद व परिशिष्टातील अटींनुसार कार्यवाही करण्याची जबाबदारी संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांची राहील.