ग्रामिण भागातील महिलांसाठी शिलाई मशीन व पिठाची गिरणी मोफत मिळवण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
संदर्भ :- मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा यांचे कडुन आलेली दि. 08/02/2024 रोजीची मंजुर नस्ती.
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये महिला बालकल्याण विभाग जिल्हा परिषद बुलडाणा अंतर्गत जिल्हा परिषद सेस 2023-24अंतर्गत वैयक्तीक लाभाच्या योजना (DBT) द्वारे राबविन्यासाठी अटी व शर्तीच्या अधिन राहुन ग्रामिण भागातील महिला व मुली यांचे कडुन अटी व शर्ती नुसार दिनांक 09/02/2024 ते 22/02/2024 या कालवधी अर्ज करायचे आहे.
योजनेचे नाव
1. ग्रामिण भागातील अपंग महिला व मुलींना पिठाची चक्की पुरविणे.
2. ग्रामिण भागातील महिला व मुलींना पिक्को व फॉल मशिन पुरविणे.
या योजनांशी संबधित अटी शर्ती सोबत जोडण्यात आलेल्या आहेत. सोबतच अर्जाचे प्रारूप जोडलेले आहे. अटी व शर्तींची पुर्तता करणारे पात्र अर्जच प्रकल्प स्तरावर घेण्यात यावेत व पडताळणी करुन दि. 23/02/2024 रोजी अर्जासह विहीत नमुन्यातील सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपी या कार्यालयास सादर करावी.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मबाक), जिल्हा परिषद बुलडाणा