मंत्रिमंडळ ‘हे’ महत्वपूर्ण निर्णय तुम्ही जाणून घेतलेत का?
➡️ मुंबईकरांना यावर्षी सुद्धा मालमत्ता करवाढ नाही
➡️ नमो महारोजगार मेळाव्यांमधून २ लाख रोजगार, स्वयंरोजगार निर्माण करणार
➡️ ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील; मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून लाभ देणार
➡️ राज्यातील सर्व पालिकांमध्ये आता नगरोत्थान महाभियान राबवणार
➡️ उत्पन्नवाढीकरिता शेतकऱ्यांना बांबू लागवड अनुदान देणार
➡️ ‘मधाचे गाव’ योजना राज्यभर राबविणार; मध उद्योगाला बळकटी
➡️ पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जुन्नर तालुक्यात ‘बिबट सफारी
➡️ शिर्डी विमानतळाचा अधिक विस्तार; नवीन इमारत उभारणी
➡️ धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागर जागा

➡️ न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते
➡️ सांगोला येथील स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पास सुधारित मान्यता
➡️ बिगर कृषी सहकारी संस्थांना अर्थसहाय्य; ठेवीचे संरक्षण
➡️ कोंढाणे लघु प्रकल्पाच्या जादा खर्चास मान्यता
➡️ दुर्घटनाग्रस्त झालेल्या तिवरे लघु पाटबंधारे योजनेची पुनर्स्थापना
➡️ नांदेडच्या गुरुद्वारासाठी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा अधिनियम
➡️ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचावण्यासाठी जनसंपर्क अधिकारी नेमणार
➡️ कृषी विद्यापीठातील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचे वय आता ६० वर्ष
➡️ सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकामचे नवीन मंडळ कार्यालय
➡️ गोसेवा आयोगासाठी सहआयुक्त पशुसंवर्धन पद
➡️ संत सेवालाल महाराज बंजारा, लमाण तांडा समृद्धी योजना