Take a fresh look at your lifestyle.

महिला बचत गटांना शेळी पुरवठा करणेबाबत शासन निर्णय जारी

0

महिला बचत गटांना शेळी युनिट पुरवठा करणे शासन निर्णय– बकरी पालनाच्या माध्यमातून महिला बचत गटांचे उत्पन्न वाढून बचत गटांचे बळकटीकरण करणे, त्यांचे स्थलांतर कमी करणे या कार्यक्रमाअंतर्गत मंजूर “Supply of Goat Units to Women SHGS (१० Female+ १ Male)” या रु ५००.०० लक्ष इतक्या किंमतीच्या कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सुचनांबाबत निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय या शासन निर्णयांन्वये अधिक्रमित करण्यात येत असुन या शासन निर्णयांसोबत जोडलेल्या परिशिष्ट क्रमांक १ मध्ये नमुद केलेल्या मार्गदर्शक सुचनांना मंजूरी प्रदान करण्यात आली आहे.

सदर मार्गदर्शक सूचनांनुसार वितरीत तरतूदींच्या मर्यादेत योजना राबविण्याबाबत त्वरीत कार्यवाही आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी करावी व भौतिक अहवालासह कार्यक्रम पुर्तता प्रमाणपत्र शासनास सादर करण्याची दक्षता घेण्यात येणार आहे.

आदिवासी समुदायातील लोक हे प्रामुख्याने दुर्गम भागात राहत असल्याने त्यांच्याकडील जमीन उंचसखल, डोंगराळ हलक्या प्रतीची खडकाळ स्वरुपाची असते, त्या जमीनीत येणारे उत्पन्नाचे प्रमाण हे कमी असते, योग्य प्रमाणात पाऊस न झाल्यास त्यांच्या उत्पन्नावर त्याचा मोठा परिणाम होतो. परिणामी त्यांना रोजगाराच्या शोधात कुंटूबासह स्थलांतर करावे लागते. सदर योजनेअंतर्गत शेतीस पुरक व्यवसाय म्हणून पुशपालन व्यवसायासाठी दहा शेळया व एक बोकड पुरविल्यास शेतकऱ्यांच्या कुटुंबास आर्थिक फायदा होईल व त्यांचे होणारे स्थलांतराचे प्रमाण काही अंशी कमी होऊन त्यांचे जीवनमान उंचावेल हाच या योजनेचा उद्देश आहे. सदरची योजना हि आदिवासी महिला बचत गटांसाठी राबविण्याचे नियोजन आहे.

संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प / पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी महामंडळ, गोखलेनगर, पुणे