Take a fresh look at your lifestyle.

गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती सुधारणा करण्याबाबत शासन निर्णय जारी

0

महाराष्ट्र राज्यातील जे गुणवंत विद्यार्थी कांदळवन व सागरी जैवविविधता या तद्नुषंगीक विषयात पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका व पीएचडी अभ्यासक्रमासाठी एकूण २५ विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात यावी, असा शासनाने निर्णय घेतला आहे. सदर योजनेच्या सद्यस्थितीतील शिष्यवृत्तीची अर्हता / निकष यामध्ये तसेच अभ्यासक्रमामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.

२. प्रस्तूत योजनेकरीता शिष्यवृत्तीची सुधारीत अर्हता/निकष खालील प्रमाणे निश्चित करण्यात येत आहेत:-

महाराष्ट्र राज्यातील जे गुणवंत विद्यार्थी कांदळवन व सागरी जैवविविधता या तद्नुषंगीक विषयात (Earth and Marine Science ) पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका, व पीएचडी अभ्यासक्रमासाठी THE (Times Higher Education) Ranking ३०० च्या आतील / किंवा कस (Quacquarelli Symonds ) Ranking 300 च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतील, अशा एकूण २५ विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येईल.

३. प्रस्तूत योजनेचा लाभ प्रदान करण्यासाठी अभ्यासक्रमामध्ये सुधारणा करण्यात येत असून अभ्यासक्रमांची व्याप्ती वाढविण्यात येत आहे. खालील अभ्यासक्रम/शाखांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ घेता येईल.

४. अभ्यासक्रम/शाखा Marine Science, Marine Environmental Science, Marine Policy Marine Ecology, Mangrove Ecology, Oceanography, Marine Biology, Marine Fisheries, Marine Bio- Technology, Marine Microbiology, Marine Bio- diversity, Climate Change and Mangrove Biodiversity/Marine Biology, Carbon Sequestration in Mangroves/Marine Ecosystem, Sea level rise in mangroves, Marine/Coastal Management etc.

सदर योजनेच्या अंमलबजावणी करिता शासन निर्णय दिनांक २४ मे २०२३ मधील अन्य अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल करण्यात येत नसून सदर योजनेकरीता त्या लागू राहतील.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२४०११२१७३८३४१०१९ आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकीत करुन काढण्यात आला आहे.