Take a fresh look at your lifestyle.

धनगर समाजातील लाभार्थ्यांकरीता घरकुल योजना…

0

राज्यातील भटक्या जमाती-क तथा धनगर समाजाचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागात व्यास्तव्यास असलेल्या भटक्या जमाती-क तथा धनगर समाजासाठी संपूर्ण राज्यात 10 हजार घरे बांधून देण्याचे उद्दिष्ट शासनाने निर्धारित केले आहे. या योजनेंतर्गत जिल्हयात ग्रामीण भागात व्यास्तव्यास असलेल्या भटक्या जमाती-क तथा धनगर समाजासाठी घरकुल

योजना सहाय्यक संचालक, इतर मागास बहूजन मागास विभागाच्या वतीने राबविण्यात येते. या योजनेंतर्गत लाभार्थ्यास घर बांधण्यासाठी 1 लक्ष 20 हजार रुपये अनुदान देण्यात येते.

घरकुल योजना लाभार्थी 

• यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. (अधिवास प्रमाणपत्र)

• लाभार्थी भटक्या जमाती क तथा धनगर समाजाचा असावा. (जात प्रमाणपत्र)

• लाभार्थ्यांचे उत्पन्न 1 लक्ष 20 हजार रुपयापेक्षा जास्त नसावे (उत्पन्न प्रमाणपत्र)

• लाभार्थी भूमिहीन / अल्पभुधारक असावा (सक्षम प्राधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र)

• लाभार्थ्यांने यापूर्वी कुठल्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

• लाभार्थ्यांच्या नावे कमीत कमी 30 चौ.मी. जागा असणे आवश्यक. (नमुना आठ अ ) या अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या व योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज करावा.

अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत व पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क करुन अर्ज सादर करावा. या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा.