नागरिकांनो, आता नवीन वर्षात हे नवे नियम लागू झाले…
बँक लॉकर :- RBI ने बँकेच्या लॉकरमध्ये बदल करण्यासाठी 31 डिसेंबर 2023 पर्यंतचा कालावधी दिला होता. मात्र नवीन वर्षांपासून यामध्ये बदल करण्यात आले आहे. आता नवीन बँक लॉकरच्या प्रक्रियेत ग्राहकांना वापरताना सही करावी लागणार आहे.
UPI आयडी बंद :- जर एखाद्या UPI वापरकर्त्याने त्याच्या UPI ID सोबत वर्षभरात कोणताही व्यवहार केला नसेल तर तुमचा UPI ID नवीन वर्षांपासून बंद झाला असेल.
विमा पॉलिसी :- IRDAI ने सर्व विमा कंपन्यांना ग्राहक माहिती पत्रके पॉलिसीधारकांना देणे बंधनकारक केले आहे.
इन्कम टॅक्स रिटर्न भरणे :- ज्या करदात्यांना आत्तापर्यंत आर्थिक वर्ष 2022-23 साठी त्यांचे आयकर विविरणपत्र भरण्यात अपयशी ठरले त्यांना नवीन वर्षांपासून रिटर्न भरता येणार नाही. तसेच रिटर्न भरण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतील.

सिम कार्ड :- मोबाईल सिमकार्डच्या नियमांमध्ये बदल झाले आहे. या नियमानुसार टेलिकॉम कंपनीला कोणताही मेसेज पाठवण्यापूर्वी ग्राहकांची सहमती घ्यावी लागणार आहे. यासाठी तुम्हाला बायोमेट्रिक्सद्वारे माहिती द्यावी लागणार आहे.
LPG च्या किंमती :- व्यावासायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे परंतु घरगुती सिलिंडरचा दर जैसे थेच आहे.
डिमॅट अकाउंट :- शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला डिमॅट खात्यात नॉमिनी जोडण्यासाठी शेवटची तारीख 31 डिसेंबर होती.