Take a fresh look at your lifestyle.

‘या’ घटकातील विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर व पी.एच.डी. अभ्यासक्रमाकरिता ‘या’ शिष्यवृती योजनेचा लाभ जरुर घ्यावा…

0

परदेशातील नामांकित विद्यापिठामध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर व पी.एच.डी. अभ्यासक्रमाकरिता ही शिष्यवृती देण्यात येते.

योजनेच्या अटी 

• महाराष्ट्राचा रहिवासी असावा

• पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३५ वर्षे पीएचडीसाठी ४० वर्षे ही कमाल वयोमर्यादा असेल.

• विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ६ लाखापेक्षा जास्त नसावे.

• जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या १०० विद्यापीठामध्ये ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश लंडन स्कूल मिळालेल्या विद्यार्थ्यांना उत्पन्न मर्यादा लागू नाही.

• परदेश शिष्यवृती योजनेअंतर्गत दोन वर्षे कालावधीचाच एमबीए अभ्यासक्रम अनुज्ञेय राहील.

• भारतीय आयुर्विज्ञान परीषदेच्या संकेतस्थळावरील एमडी व एमएस अभ्यासक्रमच प्रवेशासाठी पात्र असणार आहे.

• परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत ३०० च्या आत असावा

योजनेअंतर्गत लाभ

• विद्यार्थ्यांस वार्षिक निर्वाह भत्ता अमेरिका व इतर राष्ट्रांसाठी यु.एस. डॉलर १५ हजार ४०० तर यु.के. साठी जी. बी. पौंड ९ हजार ९०० इतका अदा करण्यात येतो.

• विद्यार्थ्याला आकस्मिक खर्चासाठी यु. एस. ए. व इतर देशांसाठी यू.एस. डॉलर १ हजार ५०० तर यु. के साठी जी.बी. पौंड १ हजार १०० इतके देण्यात येतात.

संपर्क:- अधिक माहितीसाठी जिल्हा समाज कल्याण आयुक्तालय येथे संपर्क साधा.