लेक लाडकी योजना; जाणून घ्या सविस्तर माहिती….
महाराष्ट्रात 1 एप्रिल 2023 पासून जन्मलेल्या मुलींना ‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत 1 लाख 1 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. या योजनेसाठी राज्यभरातून अर्ज मागवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आपण लेक लाडकी योजना नेमकी काय आहे, कुणाला या योजनेचा लाभ मिळणार आहे, या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा याची सविस्तर माहिती पाहणार आहे.
योजनेचा लाभ :- “लेक लाडकी योजनेसाठी अर्ज आणि प्रस्ताव विधीमंडळाचं अधिवेशन झाल्याच्यानंतर योजनेचा लाभ द्यायला सुरुवात होईल.
पात्रता :- लेक लाडकी योजनेचा लाभ पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबांना दिला जाणार आहे. या कुटुंबांना मुलीच्या जन्मानंतर 5 हजार रुपये, इयत्ता पहिलीत 6 हजार रुपये, सहावीत 7 हजार रुपये, अकरावीत 8 हजार रुपये अनुदान दिले जाईल आणि लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख देण्यात येतील. अशी ही एकूण 1 लाख 1 हजार रुपये देण्यात येणार आहे.
लाभार्थी निवड :- ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये 1 एप्रिल 2023 रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील. एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील.
• पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता, पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. मात्र, त्यानंतर माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
• 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी / मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना (स्वतंत्र) ही योजना लागू राहील.
लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक राहील. लाभार्थीचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.

अर्जासोबत जोडायची कागदपत्रे
• लाभार्थीचा जन्माचा दाखला
• कुटुंब प्रमुखांच्या उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.)
• लाभार्थीचे आधार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहिल.)
• पालकाचे आधार कार्ड
• बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स
• रेशनकार्ड (पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकितप्रत),
• मतदान ओळखपत्र
• शाळेचा दाखला
• कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र