पशुपालकांसाठी सुवर्ण संधी; 75 टक्के अनुदानावर विविध योजनांचे अर्ज सुरु…
राज्य सरकारच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. यामध्ये दुधाळ जनावरे शेतकऱ्यांना वाटली जातात. तर शेळी-मेंढी गट वाटप केला जातो. सरकारच्या योजनांच्या लाभ घेऊन असे अनेक शेतीपूरक व्यवसाय सुरु करू शकतात. यासाठी सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली असून, 18 डिसेंबर ही अखेरची मुदत असणार आहे. त्यामुळे आज जवळच्या डिजिटल केंद्रात जाऊन अर्ज करा.
राज्य सरकारकडून पशुपालकांसाठी चालवल्या जाणाऱ्या योजनांचे राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय असे स्वरूप आहे. या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज 15 डिसेंबरपर्यंत करण्यास मुदत देण्यात आली होती. मात्र या योजनांचे समाधानकारक अर्ज संख्या प्राप्त न झाल्याने ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 12 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. तरी पशुपालकांनी योजनांसाठी अधिकाधिक अर्ज भरुन योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्य स्तरीय योजनामध्ये 10+1 शेळीगट, दोन दुधाळ जनावरांचा गट वाटप व 1000 मांसल कुक्कुट पक्षीगृह बांधकाम या योजनासाठी अर्ज शेतकऱ्यांना करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन पशु संवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे. तर मोबाईलव्दारे अर्ज करण्यासठी AIH.MAHABMS या अँपवर जाऊनही अर्ज करता येणार आहे. पशु संवर्धन विभागातील सर्व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.