Take a fresh look at your lifestyle.

‘या’ पद्धतीचा वापर करुन आपले बंद झालेले बँक खाते पुन्हा सुरु करता येणार…

0

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बंद झालेल्या बँक खात्यांना पुन्हा सुरु करण्यासाठी नियमांमध्ये बदल केले आहेत. तर ग्राहकांची फसवणूक थांबवण्यासाठी नियमही कडक केले आहे.

RBI च्या माहितीनुसार बंद झालेली खाते पुन्हा उघडण्यासाठी ग्राहकांना केवायसी सबमिट करावा लागणार आहे. हा केवायसी बँकेच्या कोणत्याही शाखेत सबमिट करता येईल. बंद झालेले बँक खाते पुन्हा सुरु करण्यासाठी बँका कोणतेही शुल्क आकारणार नाही.

बंद झालेली खाते पुन्हा सुरु झाल्यानंतर ग्राहकांना किमान सहा महिने व्यवहार करावा लागेल तसेच त्यावर आरबीआयची कडक नजर असणार आहे. त्यामुळे ग्राहकांचे आर्थिक नुकसान होणार नाही. आरबीआयचा हा नियम 1 एप्रिलपासून लागू करण्यात येणार आहे. यामध्ये छोट्या बँकेपासून मोठ्या बँकेपर्यंत सर्वांचा समावेश करण्यात आला आहे.