भूजल विभागाचा अभिनव उपक्रम; शेतकरी बांधवांना कळणार आता आपल्या गावातील भूजल साठा…
भूजल विभागाने राज्यातील प्रत्येक गावातील भूजलाचा नकाशा आता ऑनलाईन उपलब्ध करून दिला आहे. हा नकाशा ऑनलाइन उपलब्ध करून देण्याच कारण म्हणजे सामान्य जनतेला, शेतकरी बांधवांना गावात व शहरात किती भूजल साठा आहे याची माहिती मिळावी हे आहे.
पुणे, अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक अश्या सहा विभागाच्या भूजलाचा नकाशा वेबसाईटवर देण्यात आलेला आहे. त्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जाऊन खालीलप्रमाणे नकाशा पाहावा लागेल.

भूजल नकाशा पाहण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा
▪️सर्वप्रथम http://gsda.maharashtra.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.
▪️त्यानंतर विभाग, जिल्हा, तालुका, गाव ही माहिती भरावी.
▪️त्यानंतर एक पीडीएफ डाउनलोड होईल ज्यामध्ये तुम्ही निवडलेल्या जागेचा भूजल नकाशा व त्यासंदर्भातील उपयुक्त सूचना पीडीएफमध्ये देण्यात आलेल्या असतील.
▪️नकाशामध्ये विविध चिन्ह व रंगाच्या माध्यमातून पाण्याची पातळी, नकाशातील रंग त्याचप्रमाणे घ्यावयाच्या उपायोजना दर्शविण्यात आल्या आहेत.