Take a fresh look at your lifestyle.

गरोदर स्त्रियांना ‘या’ योजनेअंतर्गत मिळणार एकाचवेळी पैसे…

0

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना पहिल्या अपत्यासाठी दोन टप्प्यात पाच हजारांचा लाभ मिळणार आहे. तर 1 एप्रिल 2022 नंतर जन्मलेल्या दुसऱ्या अपत्यासाठी म्हणजेच मुलगी झाल्यास सहा हजार रुपये एकाचवेळी दिले जाणार आहेत. मात्र महत्वाचं म्हणजे बाळ साडेतीन महिन्याचे झाल्यावर लस टोचल्यानंतर ही रक्कम मिळणार आहे.

योजनेच उद्दिष्ट :- गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना मजुरी कमी मिळते. त्या नुकसानीची भरपाई मिळावी जेणेकरून बाळाच्या जन्मापूर्वी आणि नंतर पुरेशी विश्रांती घेण्यास प्रोत्साहन मिळेल या हेतूने योजनेत हा बदल करण्यात आला आहे.

‘या’ ठिकाणी करता येईल नोंदणी :– महिलांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र शासनाच्या https://pmmvy.wcd.gov.in या वेबसाईटवर अर्ज भरावा लागणार आहे.

लाभासाठी आवश्यक कागदपत्रे 

▪️आधार कार्ड व मोबाईल क्रमांक

▪️बँक पासबुक

▪️बाळाचे लसीकरण नोंदणी कार्ड

▪️बाळाचा जन्म दाखला

▪️उत्पन्नाचा दाखला