आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी LIC गोल्डन ज्युबिली स्कॉलरशिप…
शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये किमान 60% गुण अथवा समकक्ष श्रेणीद्वारे इयत्ता दहावी/बारावी/ डिप्लोमा अथवा समकक्ष अभ्यासक्रम उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अखिल भारतीय पातळीवर शिष्यवृत्ती घोषित करताना एलआयसी गोल्डन ज्युबिली फाऊंडेशनला आनंद होत आहे.

• एलआयसीच्या प्रत्येक विभागीय केंद्रामध्ये 20 सर्वसाधारण शिष्यवृत्तीः पुढील विषयांवरील उच्च शिक्षण घेण्यासाठी (मुलांसाठी व मुलींसाठी प्रत्येकी 10):
(i) मेडिसिन, अभियांत्रिकी, कोणत्याही शाखेची पदवी, कोणत्याही क्षेत्रातील पदविका किंवा एकात्मीक कोर्सेस
(ii) सरकार मान्य महाविद्यालय/संस्थांमधून व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रम किंवा औद्योगिक शिक्षण संस्था (आयटीआय) मधील अभ्यासक्रम
• एलआयसीच्या प्रत्येक विभागीय क्षेत्रात मुलींसाठी 10 विशेष शिष्यवृत्ती – 10 + 2 पद्धती अंतर्गत इयत्ता 11 वी/ 12 वी/पदविका/इन्टरमिडियटचा अभ्यास करण्यासाठी
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2024