Take a fresh look at your lifestyle.

राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना सन २०२३-२४ साठी अर्ज करण्यास मुदतवाढ…

0

देशातील शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना सन २०२३ २४ साठी अर्ज करण्यास मुदतवाढ देशातील नामांकित शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्याथ्र्यांना राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती या योजनेसाठी सन २०२३ २४ करिता विद्याथ्यांकडून जाहिरातीद्वारे अर्ज मागविण्यात आले होते.

तथापि शैक्षणिक संस्थामधील सन २०२३-२४ मधील प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. सबब आयुक्तालयाचे दिनांक १३.०७.२०२३ च्या जाहिरातीद्वारे मागविण्यात आलेल्या उपरोक्त अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकास याद्वारे मुदतवाढ देण्यात येत आहे. खालील नमूद वेबसाईटवरून अर्ज डाऊनलोड करून तो परिपूर्ण व आवश्यक त्या कागदपत्रासह दिनांक ०४/०१/२०२४ रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत पोस्टाने किंवा समक्ष ‘समाजकल्याण आयुक्तालय, ३ चर्च रोड, पुणे- ४११००१ येथे सादर करावेत. अर्जाचा नमुना व अधिक सविस्तर माहितीसाठी www.maharashtra.gov.in (जलद दुवे-रोजगार) या संकेत स्थळाला भेट द्यावी.

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक व वेळ गुरुवार दिनांक ०४/०१/२०२४ रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत