या योजनेद्वारे मुलींना मिळणार 50 हजार रुपये…
राज्य सरकारने माझी कन्या भाग्यश्री योजना राबवली आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकार मुलींच्या जन्मानंतर 50,000 रुपये देत आहे. सरकारने मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी तसेच सुधारणा करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. दोन मुली असलेल्या कुटुंबांला या योजनेचा लाभ मिळणार आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजना संपूर्ण राज्यात सर्व गटातील दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच बीपीएल कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी ही योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ मुलीचा जन्म झाल्यापासून मुलगी 18 वर्षे वयाची होईपर्यंत घेता येणार आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ कसा घ्याल
माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत आई आणि मुलीच्या नावाने बँकेत संयुक्त खाते उघडले जाते. यावर 1 लाख रुपयांचा अपघात विमा आणि 5000 रुपयांचा ओव्हरड्राफ्ट उपलब्ध आहे.
याशिवाय मुलीच्या जन्मानंतर पालकांना नसबंदी करून घ्यायची असेल तर त्यांना 50 हजार रुपये मिळतात. मात्र माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत मिळालेले पैसे मुलीच्या शिक्षणासाठी वापरता येतील.

आवश्यक कागदपत्रे
▪️आधार कार्ड
▪️आई किंवा मुलीचे बँक खाते पासबुक
▪️मोबाईल नंबर. पासपोर्ट फोटो
▪️रहिवासी दाखला
▪️उत्पन्नाचा दाखला