8 लाख रुपये अनुदान देणारी ड्रोन दीदी योजना…
या योजनेअंतर्गत सरकार देशभरातल्या 15 हजार महिला बचत गटांना ड्रोन वितरित करणार आहे. त्यानंतर या महिला हे ड्रोन शेतकऱ्यांना शेती कामासाठी भाडेतत्त्वावर देऊ शकणार आहेत.

ड्रोनच्या सहाय्यानं खतं, कीटकनाशकांची फवारणी करण्याचं, तसंच शेतीतल्या वेगवेगळ्या कामांसाठी ड्रोनचा वापर कसा करायचा, याचं या बचत गटातल्या महिलांना 15 दिवसांचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे.