Take a fresh look at your lifestyle.

पेट्रोल-डिझेललाही एक्सपायरी डेट असते? जाणून घ्या सविस्तर माहिती

0

दुकानातून एखादे समान खरेदी करताना स्पेशली फूड प्रोडक्ट घेताना आपण त्याची एक्सपायरी डेट बघतो. औषध घेताना तर ती तारीख पाहूनच औषधे घेतली जातात.

पण तुम्ही कधी विचार केलाय का ? की, आपली गाडी ज्या इंधनावर चालते. ते इंधन म्हणजे पेट्रोल कधी एक्सपायर होते?, त्याला अंतिम तारीख असते का? चला आज याबद्दल जाणून घेऊयात.

जाणून घ्या नेमके प्रकरण :- ▪️ पेट्रोल किंवा डिझेल एखाद्या सीलबंद कंटेनरमध्ये भरून 20 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात ठेवल्यास ते सहा महिने ते एक वर्ष टिकू शकतं. परंतु, तेच पेट्रोल वाहनाच्या टाकीत भरलेलं असेल तर त्या पेट्रोलचं आयुष्य केवळ तीन महिने इतकंच असतं.

▪️ तर इंधन सीलबंद कंटेनरमध्ये भरून ठेवलेलं असेल आणि बाहेरचं तापमान 30 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असेल तर त्या पेट्रोलचं आयुष्य केवळ तीन महिने इतकंच असतं. तसेच इंधन हे वाहनाच्या टाकीत भरून ठेवलेलं असेल आणि आसपासचं तापमान हे 30 अंश किंवा त्याहून अधिक असेल तर त्या इंधनाचं आयुष्य एका महिन्याहून कमी असतं.

दरम्यान, भारतासह जगभरातल्या अनेक देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथेनॉल मिसळलं जातं. या केमिकल आणि इथेनॉलमुळे पेट्रोल-डिझेलचं आयुष्य कमी होतं.