Take a fresh look at your lifestyle.

तृतीयपंथी विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक फी माफ बाबत शासन निर्णय जारी

0

महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. तृतीयपंथी विद्यार्थ्यांना विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात उच्च शैक्षणिक फी माफिचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आता विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तृयीयपंथी विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक फी विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ भरणार आहे.

याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून शासन निर्णय जारी केला होता. तसेच या निर्णयाला सर्व कुलगुरूंनी बहुमताने प्रतिसाद देत निर्णय मान्य केला आहे. त्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शासन निर्णय काढत यापुढे तृतीयपंथी विद्यार्थ्यांना विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात फी माफ करण्याचा शासन निर्णय काढला आहे.