Take a fresh look at your lifestyle.

‘या’ फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना १२ हजार शिष्यवृत्ती मिळणार

0

‘सकाळ इंडिया फाउंडेशन’तर्फे नारायण आणि सुधा बनसोड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विदर्भातील एका विद्यार्थ्याला आणि एका विद्यार्थिनीला शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. त्यासाठी गरजू विद्यार्थ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येतील.

बनसोड कुटुंबीयांनी दिलेल्या देणगीच्या व्याजातून दरवर्षी या दोन शिष्यवृत्त्या दिल्या जातात. दोन्ही शिष्यवृत्त्या प्रत्येकी १२ हजार रुपयांच्या असून, पदवी पूर्ण होईपर्यंत मिळेल. या शिष्यवृत्त्या २०१७-१८ मध्ये सुरू झाल्या आहेत.

अर्ज करण्याची पात्रता :- शासकीयदृष्ट्या विदर्भातील T जिल्ह्यातील रहिवासी असलेले आणि बाद आर्थिकदृष्ट्या अल्प उत्पन्न गटातील गील विद्यार्थी तसेच मार्च २०२३ मध्ये प बारावीच्या परीक्षेत ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण ‘मिळवलेले विद्यार्थी आणि अभियांत्रिकी, वैद्यकीय, वास्तुविशारद, नर्सिंग, विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेतील प्रथम वर्षाचे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज करण्याची पद्धत :- पात्र विद्यार्थ्यांनी अर्जात संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, ई- मेल यांचा उल्लेख करावा. सोबत बारावीची गुणपत्रिका, पालकांच्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला यांची झेरॉक्स प्रत जोडावी. शिष्यवृत्तीसाठी अर्ज पाठविण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत असेल.

● सकाळ इंडिया फाउंडेशन, ५९५, बुधवार पेठ, पुणे ४११००२. दूरध्वनी क्रमांक : ०२०- ६६०३५९३५ – ई-मेल sakalindiafoundation@esakal.com किंवा contactus@ sakalindiafoundation.org