Take a fresh look at your lifestyle.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्ताने स्थानिक सुट्टी जाहीर करणेबाबत शासन परिपत्रक जारी…

0

सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र. सार्वसु-११९६/प्र.क्र.५/९६/२९, दिनांक १८ सप्टेंबर,१९९६ अन्वये मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हयातील शासकीय / निमशासकीय कार्यालयांना प्रतिवर्षी “अनंत चतुर्दशी” या दिवशी आणि सन २००७ पासून गोपाळकाला (दहीहंडी) निमित्ताने मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आता सन २०२३ मध्ये मुंबई व मुंबई उपनगर जिल्हयातील सर्व शासकीय/ निमशासकीय कार्यालयांना याद्वारे खालीलप्रमाणे तिसरी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

२. हे आदेश मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय/निमशासकीय कार्यालयांना लागू राहतील.

३. वरील स्थानिक सुट्टी शासन निर्णय क्रमांक पी.ॲन्ड एस.नंबर पी-१३/॥/बी, दिनांक ५ नोव्हेंबर, १९५८ मधील तरतूदीनुसार जाहीर करण्यात येत आहे.

४. सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३१२०५१५३३३५८६०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात आला आहे.