कृषी विभाग अंतर्गत येणारी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना
● लाभार्थी
• राज्यातील सर्व वहिती धारक खातेदार शेतकरी
• त्यांच्या कुटुंबातील वहीती धारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक सदस्य असे १० ते ७५ वयोगटातील एकूण दोन व्यक्ती (आई-वडील, शेतकऱ्याची पती-पत्नी, मुलगा, अविवाहित मुलगी यापैकी एक व्यक्ती)
● समाविष्ट बाबी
1. रस्ता / रेल्वे अपघात
2. पाण्यात बुडून मृत्यू
3. जंतूनाशके हाताळतांना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा
4. विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात
5. वीज पडून मृत्यू
6. खून
7. उंचावरून पडून झालेला अपघात
8. सर्पदंश व विंचुदंश
9. नक्षलाईटकडून झालेल्या हत्या
10.जनावरांच्या खाल्ल्यामुळे / चावण्यामुळे जखमी / मृत्यू
11. बाळंतपणातील मृत्यू
12. दंगल
13. अन्य कोणतेही अपघात, या अपघातांचा समावेश असेल
● लाभाचे स्वरुप
• अपघाती मृत्यू – रु. २,००,०००/-
• दोन डोळे अथवा दोन हात अथवा दोन पाय रु.२,००,०००/-
• एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास रु.२,००,०००/-
• एक डोळा अथवा एक हात/एक पाय निकामी झाल्यास रु.१,००,०००/-
● कागदपत्रे
1. ७/१२ उतारा
2. मृत्यूचा दाखला
3. शेतकऱ्यांचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्याकडील गांव नमुना नं. ६ क नुसार मंजूरझालेली वारसाची नोंद.
4. शेतक-याच्या वयाच्या पडताळणी करीता शाळा
सोडल्याचा दाखला / आधारकार्ड
5. अपघाताच्या स्वरुपानुसार अंतिम विमा प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे

● अर्ज कूठे करावा
तालुका कृषी अधिकारी (३० दिवसांच्या आत)