उमेदवारांनो, ही संधी गमावू नका; राज्यातील कारागृहांसाठी नवीन २ हजार पदनिर्मितीला मान्यता
राज्यभरातील ६० कारागृहांकरिता नवीन २ हजार पदनिर्मिती करण्यासाठी गृह विभागाने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार शुक्रवारी ६ ऑक्टोबर रोजी शासन आदेश पारित केला आहे. यामुळे राज्यातील तुरुंगांमधील मनुष्यबळाचा प्रश्न काहीसा सुटणार आहे. यात जळगाव जिल्ह्यासाठी एकूण २३ विविध पदांचा समावेश आहे
तसेच, कारागृह विभागांतर्गत असलेल्या मध्य विभाग या प्रादेशिक कार्यालयाचे विभाजन करून जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील कारागृहांसाठी नाशिक येथे नवीन प्रादेशिक कार्यालय निर्माण करण्यास या परिपत्रकानुसार तत्वत: मान्यता देण्यात आली आहे.
सदर वस्तुस्थिती विचारात घेता कारागृह विभागात विविध संवर्गात नवीन पदनिर्मितीची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

मंत्रिमंडळाने दि. ३ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेस अनुसरून गृह विभागाच्या अधिनस्त कारागृह विभागात सद्यस्थितीत मंजूर असलेल्या ५०६८ पदांव्यतिरिक्त पुढीलप्रमाणे विविध संवर्गात २००० नवीन पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.