Take a fresh look at your lifestyle.

बार्टीमार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सहाय्य योजना २०२३

0

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील जे उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (गट-अ व गट-ब), विद्युत अभियांत्रिकी सेवा (गट-ब), निरीक्षक, वैधमापन शास्त्र (गट-व) आणि अन्न व औषध प्रशासकीय सेवा (गट-व) मुख्य परीक्षा २०२३ साठी पात्र ठरले आहेत अशा उमेदवारांना एकरकमी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येईल.

योजनेचे स्वरूप :-

पात्र अनुसूचित जातीच्या उमेदवारांना एकरकमी रक्कम रु.१५,०००/- आर्थिक सहाय्य वार्टी मार्फत दिले जाईल.

पात्रता:- १. उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी व अनुसूचित जातीचा असावा.

२. उमेदवाराचा दि.१५/०९/२०२३ व दि.१८/०९/२०२३ रोजी जाहीर झालेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ मधील महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, निरीक्षक-वैधमापन शास्त्र, आणि अन्न व औषध प्रशासकीय सेवा निकालाच्या यादीमध्ये समावेश असावा.

अर्ज करण्यासाठी :-

१. सदर जाहिराती सोबत जोडलेल्या अर्जाची प्रिंट काढावी.

२. सदर अर्ज पूर्णपणे भरून अर्जासोबत जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, डोमेसाईल प्रमाणपत्र, उमेदवारांचे बँक खाते क्र. (पासबुकच्या प्रथम पृष्ठाची प्रत ) व महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ चे प्रवेशपत्र इ. सर्व कागदपत्रांची स्व-साक्षांकित प्रत व अर्ज स्कॅन करून mpscbarti.22@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवावेत.

३. कागदपत्र स्व-साक्षांकित असणे बंधनकारक आहे.

अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक :- दि. २० ऑक्टोबर २०२३.

पात्र उमेदवारांनी अधिक माहिती साठी ०२०-२६३३ ३५९६ येथे संपर्क साधावा.

अर्जाची प्रिंट काढण्यासाठी लिंक – http://barti.maharashtra.gov.in > NOTICE BOARD > Maharashtra Gazetted Civil Services Mains 2023