राज्यातील कारागिरांना ‘या’ शासकीय योजनेद्वारे मिळणार 5 % व्याजदराने कर्ज…
केंद्र सरकारने कारागिरांसंदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारने पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना लागू केली आहे. या योजनेद्वारे 30 लाख कारागिरांना लाभ मिळणार आहे. ही योजना 13 हजार कोटींची असून या योजनेमुळे देशातील कारागिराच्या आर्थिक उन्नतीसोबत त्याच्या परंपरागत कौशल्याची जपणूकही होणार आहे.
या योजनेद्वारे कारागिरांना 5 टक्के व्याजदराने कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासोबतच कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येणार असून दररोज 500 रुपयांचे मानधन व प्रशिक्षणाचे प्रमाणत्र देण्यात येणार आहे.

पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेमागचा उद्देश देशातील कारागिरांचे कौशल्य टिकावे आणि त्यातून त्याच्या आर्थिक उन्नतीला चालना मिळावी हा आहे. तसेच ही योजना तळागाळापर्यंत पोहोचवावी असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.