अनेक सरकारी कामांसाठी आता ‘हा’ एकमेव कागद राहणार पुरेसा…
‘वन नेशन, वन इलेक्शन’ची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातच आता ‘वन नेशन, वन डॉक्युमेंट’ ही योजना लागू होणार आहे. त्यानुसार आता या नियमांतर्गत जन्म-मृत्यूची नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच अनेक सरकारी कामांसाठी ‘जन्म दाखला’ हा एकमेव कागद पुरेसा असल्याचे केंद्रीय मंत्रालयाने म्हटले आहे.

केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेताना, वाहन चालविण्याचा परवाना, मतदार यादी तयार करणे, आधार क्रमांक, विवाह नोंदणीसाठी या सर्व गोष्टींसाठी आता केवळ ‘जन्म दाखला’ हे एकमेव कागदपत्र पुरेसे असणार आहे. आता वरील सर्व सेवांसाठी जन्म प्रमाणपत्राचा एकल दस्तावेज म्हणून वापर करण्यास परवानगी दिली आहे. हा कायदा येत्या 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.