Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी! शाळेला लागणार कुलूप? येत्या दिवसात शासन घेणार निर्णय

0

मुंबई- देशात कोरोनाचा प्रदुर्भाव गेल्या दीड वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून सुरु आहे. त्यामुळे शाळा आणि कॉलेजेस बंद करण्यात आले होते. सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण दिलं जात होतं. मात्र गेल्या काही महिन्यांमधील कोरोनाची समाधानकारक स्थिती बघता हळूहळू शाळा आणि कॉलेजेस सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शाळा कॉलेजेस सुरु झाले होते. मात्र आता कोरोनच्या नव्या व्हेरिएन्टनं परत चिंता वाढवली आहे. राज्यात बघता बघता ओमायक्रोनचे रुग्ण वाढत चालले आहेत. जर ओमायक्रोन असाच राज्यात वाढत राहिला तर सुरु करण्यात आलेल्या शाळा पुन्हा बंद कराव्या लागतील असा इशारा काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिला होता. आता मंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा शाळा कॉलेजेस बंद होणार का याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.