केंद्र शासनाची जबरदस्त योजना; 60 वर्ष वय झालेल्यांना मिळणार लाभ…
वृद्धापकाळात पैशांसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागलं नसतं तर निवृत्तीनंतरचं आयुष्य चांगलं झालं असतं. यासाठी कष्टाचे पैसे सुरक्षितपणे गुंतवणं महत्त्वाचं असतं. यासाठी पोस्ट ऑफिसची एक जबरदस्त योजना तुम्हाला उपयुक्त ठरू शकते. या योजनेत बचत करणं सुरक्षित तर आहेच, तसंच त्यातून खात्रीशीर परतावादेखील मिळतो. ज्येष्ठ नागरिक बचत योजना असं या योजनेचं नाव आहे. ही योजना केंद्र सरकारमार्फत राबवली जाते. या योजनेत तुम्ही एक ठराविक रक्कम गुंतवली तर त्यातून तुम्हाला चांगला परतावा मिळतो. हा परतावा बँक एफडीपेक्षा जास्त आहे. सध्या या योजनेतून 8.2 टक्के दराने व्याज मिळत आहे. व्याजाचे दर तीन महिन्यांनी बदलतात.
ज्येष्ठ नागरिकांसाठी खास आहे योजना:– पोस्ट ऑफिसची ज्येष्ठ नागरिक बचत योजना अर्थात एससीएसएस ही 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींसाठी आहे. तसंच ज्या व्यक्तींनी व्हीआरएस घेतली आहे तेदेखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात. सध्या या योजनेत 8.2 टक्के दराने व्याज मिळत आहे. जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने या योजनेत पाच लाख रुपये एकरकमी गुंतवले तर त्याला केवळ व्याजातून दर तिमाहीला 10,250 रुपये मिळू शकतात. पाच वर्षांत ही व्यक्ती केवळ व्याजातून दोन लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकेल.
पोस्ट ऑफिसची सीनिअर सिटिझन सेव्हिंग्ज स्कीम
एकरकमी पैसे – पाच लाख रुपये
जमा कालावधी – पाच वर्षं
सध्याचा व्याजदर – 8.2 टक्के
मॅच्युरिटी रक्कम – 7,05,000 रुपये
व्याजाद्वारे उत्पन्न – 2,05,000 रुपये
तिमाही उत्पन्न – 10,250 रुपये

योजनेचे फायदे:- ही बचत योजना केंद्र सरकारमार्फत चालवली जाते. त्यामुळे या योजनेत बचत करणं हा विश्वसनीय आणि सुरक्षित पर्यायांपैकी एक पर्याय म्हणता येईल. आयकर कायदा कलम 80 सीनुसार या योजनेत बचत करणाऱ्या व्यक्तीला दर वर्षी 1.5 लाख रुपयांपर्यंत करसवलत मिळते. पोस्ट ऑफिसच्या या योजनेचं अकाउंट देशातल्या कोणत्याही सेंटरवर ट्रान्सफर करता येतं. योजनेंतर्गत दर तीन महिन्यांनी व्याजाचं पेमेंट अकाउंटला जमा होतं.
या बँकेत उभा आपले खाते:- ICICI बँक, कॉर्पोरेशन बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडौदा, केनरा बँक, आंध्रा बँक, सिंडीकेट बँक, यूको बँक, IDBI बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, विजया बँक यूनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, इलाहाबाद बँक